आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर मात:माजी खासदार निलेश राणे यांची कोरोनावर मात, ट्विट करून शुभेच्छा देणाऱ्यांचे मानले आभार

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निलेश राणे यांनी ट्विट करून शुभेच्छा देणाऱ्यांचे मानले आभार

माजी खासदार निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी एक ओळीचे ट्विट करुन माहिती दिली आहे. निलेश राणे यांनी 16 ऑगस्ट रोजी ट्विटरवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. “माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो”, असे निलेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत.

निलेश यांना 16 ऑगस्ट रोजी कोरोनाचे निदान झाले होते. याबाबत त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. तेव्हापासून ते मुंबईत सेल्फ क्वारंटान होते. यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती. “कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले होते.

दरम्यान क्वारंटाइन असतानाही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकाही करत होते. नीलेश राणे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. त्याबद्दल नीलेश यांनी रोहित यांचे आभारही मानले होते. आता रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

निलेश राणे हे सोशल मीडियावरील आक्रमक पवित्र्यासाठी ओळखले जातात. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनेक वेळा त्यांची ट्विटरवर जुगलबंदी रंगली आहेत

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser