आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसुली प्रकरण:माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहाची गुन्हे शाखेकडून तब्बल सात तास चौकशी, सर्व आरोप खोटे असल्याचा परमबीरांचा दावा

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाने फरार घोषित केलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज मुंबई पोलिसांसमोर हजेरी लावली. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपाखाली गुन्हे शाखेने त्यांची आज तब्बल सात तास चौकशी करण्यात आली.

गुन्हे शाखेची चौकशी पूर्ण झाली असून, परमबीर सिंहांवर लावलेले सर्व आरोप फेटाळल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल. अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे.

न्यायालयाने फरार घोषित केले होते.

गेल्या काही दिवसांपासून चौकशीसाठी हजर न राहणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केले होते. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर यांनी फरार घोषित केले होते.

परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली गेली होती. या 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर सिंह परतल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...