आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर गँगरेप:चार नराधमांनी 13 वर्षाच्या मुलीवर केला सामुहिक बलात्कार, NGO च्या मदतीने 5 महिन्यांनंतर दाखल केला FIR

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपींनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये 7 वीतील विद्यार्थीनीचे केले होते अपहरण
  • कुणाला सांगू नये म्हणून दिली जीवे मारण्याची धमकी

ठाण्यातील भिवंडी भागात रविवारी 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या परिसरातील चार जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याशिवाय कुटुंबीयांना मारहाणही केली गेली. रविवारी पीडितेच्या कुटूंबाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपीने सातवीत शिकणाऱ्या मुलीला भिवंडीतील रिकाम्या इमारतीत नेले होते. येथे चार आरोपींनी मुलीवर बलात्कार केला. याशिवाय कुणाला हे सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.

काही दिवसांपूर्वी आरोपींनी पीडित मुलीला आणि तिच्या कुटूंबाला मारहाण केली. यानंतर पीडित कुटुंबाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गणेशपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी बलात्कारासह इतर कलमांमध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...