आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत असंतोष:मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला चार खासदारांची दांडी, आमदारांपाठोपाठ खासदारही नाराज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि सामर्थ्यशाली नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. आता आमदारांसह शिवसेना खासदारदेखील शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील एकूणच परिस्थितीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारा आणि खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चार खासदार हजर राहिले नाहीत. यात भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. राज्यात शिवसेनेचे 18 खासदार आहेत. त्यापैकी बैठकीला 14 खासदार उपस्थित होते.

शिंदेची बंडखोरी

एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. या घडामोडी कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचतात याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता आहे.