आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काळजीपणाने घेतला निष्पाप जीव:मेनहोलमध्ये पडल्याने 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, महापालिकेने काढले होते झाकण, मीरा भाईंदरमधील घटना

मिरा भाईंदर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापालिकेच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी मेनहोलचे झाकण काढण्यात आले होते.

उड्डाण पुलाखाली शौचालयाच्या टाकीचे झाकण उघडे असल्यामुळे एका चार वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला आहे. अफिफा मुस्तफा अली अन्सारी असे या मृत चिमुकलीचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या मुलीच्या मृत्यूच्या जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.

मुलीचे वडील मुस्तफा अली यांनी सांगितले की, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ते आफिफाला घेऊन आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. तिथे शेजारच्या मुलांसोबत ती खेळायला गेली होती. तेव्हाच फ्लाय ओव्हर खाली गेली आणि तिथे उघड्या गटरच्या मेन होलमध्ये पडली.

पोलिसांनी महापालिकेला उत्तर मागितले
काशी मीरा पोलिसांनी केस दाखल केली आहे. यासोबतच घटनेसाठी जबाबदार व्यक्तीची माहिती काढण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेला माहिती मागितली आहे. तपासा समोर आले की, महापालिकेच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी मेनहोलचे झाकण काढण्यात आले होते. येथे दुसऱ्या दिवशी जाळी लावण्याचे काम केले जाणार होते.

यापुर्वीही घडली आहे अशी घटना
यापूर्वी गोरेगांवच्या परिसरात पावसाच्या वेळी नाल्यामध्ये वाहून गेल्याने दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह दोन दिवसांनंतर अनेक किलोमीटर दूर नाल्यात सापडला होता.

बातम्या आणखी आहेत...