आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेल्याने रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या. त्यानंतर मात्र, शेजारील राज्यांत चांदी होत असून अॅपलचा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक नुकतेच महाराष्ट्रात राजकीय पाय रोवणाऱ्या केसीआर यांना तेलंगणात खेचून आणण्यात यश आले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे.
इलेक्ट्राॅनिक क्षेत्रात मोठे नाव
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फॉक्सकॉन तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. यासोबतच या कंपनीने राज्यातील या प्रकल्पात 1 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनही दिले आहे.
कंपनी अध्यक्ष केसीआर यांची भेट
फाॅक्सकाॅनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ही गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी फॉक्सकॉन आणि तेलंगणा सरकारमध्ये हा करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.
1 लाख रोजगाराची निर्मिती
फॉक्सकॉन कंपनीच्या गुंतवणुकीमुळे तेलंगणात तब्बल 1 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या करारामुळे 10 वर्षांच्या कालावधीमध्ये तेथे 1 लाखांपेक्षा अधिक लोकांना नोकऱ्या देण्यात येतील. मात्र तैवानची किंमत तेलंगणा राज्यात किती गुंतवणूक करणार याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
काय म्हणाले केसीआर?
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, फॉक्सकॉनचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेटअप युनिट तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यास मदत करेल. तसेच राज्यात असे अधिक उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल. या कराराच्या वेळी राज्याचे आयटी व उद्योग मंत्री के.टी. रामाराव तसेच इतर काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तेलंगणा सरकारची सर्वोतोपरी मदतीची ग्वाही
तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांना आकर्षित करण्यास सरकार यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. केसीआर आणि यंग लिऊ यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात विविधता आणण्याचे महत्व व राज्य सरकारची भूमिका यावर चर्चा केली. राज्य सरकार फॉक्सकॉन कंपनीला राज्यातील प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉनच्या अध्यक्षांना दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.