आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा मोठा निर्णय:महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीयांना सीमेपर्यंत नेण्यासाठीच मोफत एसटी बस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर कोणत्याही प्रवासासाठी मोफत एसटी सेवा नसेल : राज्य सरकार

राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकून पडलेल्यांना परतण्यासाठी ११ मेपासून एसटी महामंडळ सुविधा देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. तथापि, मोफत एसटी सेवा फक्त महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यांतील लोकांना सीमेपर्यंत नेण्यापुरती असेल. तसेच इतर राज्यांत अडकल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत मोफत पोहोचवले जाईल. याशिवाय इतर कोणत्याही प्रवासासाठी मोफत एसटी सेवा नसेल, असे सरकारने रात्री उशिरा स्पष्ट केले.

खास पोर्टल : खासगी वाहनाने वैयक्तिक प्रवास करायचा असल्यास परवानगी देण्यात येईल. एसटीच्या पोर्टलवरून परवानगी घेतल्यावरच वैयक्तिक प्रवासाला मुभा दिली जाईल.

प्रवासासाठी असे करता येईल बुकिंग

> २२ जणांचे ग्रुप वा वैयक्तिक बुकिंगसाठी यादी सादर करून परवानगी घ्यावी लागेल. वैयक्तिक व्यक्ती किंवा कुटुंबाला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागेल. > शहरी भागात पोलिस तर ग्रामीण भागात तहसीलदार कार्यालय मंजुरी देईल. . > वैयक्तिक प्रवाशांनी एमएसआरडीसीच्या पोर्टलवर बुकिंग करायचे आहे. त्यात परवानगी पत्रही अपलोड करायचे आहे. > बस पहिल्या स्टॉपला सुरू होऊन थेट शेवटच्या स्टॉपला थांबेल. बसेस प्रसाधनगृहासाठी एसटी डेपोत थांबणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...