आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी' सिनेमावरुन वाद पेटलेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपट मोफत दाखवण्याचे आयोजन केलेले आहे. तुम्ही द्वेषाचे सिनेमे दाखवून द्वेष पसरवा; आम्ही शाहिरांचे सिनेमे दाखवून प्रेम, संस्कृती पसरवू, अशी टीका आव्हाडांनी राज्यसरकारवर केलेली आहे.
एकीकडे 'द केरला स्टोरी' पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे यावरून राजकारणही तापले आहे. बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असून सिनेमा असोसिएशनने तामिळनाडूमध्ये तो दाखवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, यूपी आणि मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाशी संबंधित वाद आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे.
केदार शिंदेंची खंत
'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. केरला स्टोरीचे मोफत शो आयोजित केले दात असल्यावरुन केदार शिंदेंनी खंत व्यक्त केली होती. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?" असे केदार शिंदे म्हणाले आहेत.
काटे की टक्कर
केदार शिंदे यांनी खंत व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. केरला स्टोरीला टक्कर देण्यासाठी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन आव्हाडांनी केले आहे.
काय म्हटलेय आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, खास मराठी जनांसाठी खास मराठी चित्रपट "महाराष्ट्र शाहीर"चे विशेष आयोजन ठाणे प्रभात टॉकीज जिथे निळू फुले,डॉ.श्रीराम लागू यांच्यापासून थेट नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होत त्याचं ठिकाणी शुक्रवार शनिवार रविवार संध्याकाळी ठीक 7 वाजता विनामुल्य.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.