आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनांच्या कर्करोगावर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार:जागतिक महिलादिनी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांची घोषणा

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने ९० हजार महिलांचा मृत्यू होतो. दर ६ मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्करोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा बुधवारी, जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रुग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी नोंदणी शुल्क (केस पेपर फी) माफ करणार असल्याचेही ते म्हणाले.

कामा व आॅलब्लेस रुग्णालयात स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री महाजन म्हणाले, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू होईल. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाईल.

देशात कर्करोगामध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पूर्वी ६० ते ६५ वर्षे वयातील महिलांना हा कर्करोग होत असे. मात्र, सध्या फास्टफूडच्या जमान्यात २५ ते ३५ वर्षे वयोगटातील महिलाही त्याला बळी पडत आहेत.

राज्यभरात स्तन कर्करोग जागृती मोहीम सुरू होणार
महिलांचा जीव वाचावा, त्यांचे वेळेत निदान होऊन त्वरित उपचार व्हावेत, यासाठी ही स्तन कर्करोग जागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...