आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशा फुलवणारी पहिली बातमी:अडीच महिन्यांपूर्वी ज्या मुंबईतून दुसरी लाट आली, तेथे आता रोजच्या रुग्णांत 30% पर्यंत घट; रायपुरातही दिसतोय दिलासा देणारा कल

नवी दिल्ली / मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवे रुग्ण 10 दिवसांपासून कमी, सक्रिय रुग्ण 47% कमी

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून नव्या आशा पल्लवित करणारी बातमी आहे. मुंबईत रोजच्या रुग्णांची सरासरी १५ दिवसांपासून कमी होत आहे. देशात अडीच महिन्यांपूर्वी मुंबईतूनच दुसऱ्या लाटेने वेग घेतला. मात्र, आता येथे नवे रुग्ण ३०% घटले. ठाणे आणि छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्येही हाच कल आहे. या शहरांत एक आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. रायपुरात निम्मेच सक्रिय रुग्ण राहिले आहेत.

डब्ल्यूएचओनुसार, संसर्गाचा “पीक’ तीन निकषांआधारे मोजला जातो. पहिला -नव्या रुग्णांची सरासरी सलग ७ दिवस कमी व्हावी.  दुसरा - सक्रिय रुग्णांचा वृद्धिदर ७ दिवस शून्याखाली असावा. तिसरा - चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचा दर कमी होण्याचा कल असावा. हे तिन्ही निकष उपरोक्त शहरांत दिसत आहेत. म्हणूनच या शहरांत “पीक’ आला आहे असे मानले जाते.

पुढे काय... बेफिकीर राहाल तर नवी लाट येऊ शकते
आयसीएमआरचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, नवे रुग्ण कमी होताहेत म्हणजे संसर्ग संपत चालला असे नव्हे. मास्क- फिजिकल डस्टन्सिंग पाळले नाही तर कोरोनाची नवी लाट पुन्हा येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...