आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार नियामक सेबीचा 4 शहरांमध्ये छापा:टीव्हीवर ‘तज्ज्ञ’ निवडक शेअर्सना चांगले म्हणायचे, दर वाढताच विकून टाकायचे

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही चॅनलवरील फ्रंट रनिंगच्या विरोधात मोठ्या कारवाईत बाजार नियामक सेबीने ६ संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकत मोबाइल, संगणक, लॅपटॉप जप्त केले आहेत.

बिझनेस चॅनलवरील शेअर शिफारशीशी संबंधित नोएडा, जयपूर, कोलकाता, पुण्यात ही छापेमारी झाली. तज्ज्ञ चॅनलवर शेअर्सच्या शिफारसीपूर्वीच काही संस्थांना ते सूचवून टाकायचे. यामुळे त्या संस्था मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करायच्या. नंतर तज्ज्ञ चॅनलवर शिफारस करत. त्यावर भरवसा ठेऊन सामान्य लोक शेअर खरेदी करत. यामुळे भाव वधाताच त्या संस्था नफा कमावून शेअर्स विकून टाकत. यात सामान्य गुंतवणूकदार मात्र फसवले जात. या प्रकरणी सेबीने चौकशी सुरू केली आहे.

तज्ज्ञांची विश्वासार्हता पारखूनच पैसे गंुतवा सेबी दीर्घकाळापासून असे तज्ज्ञ किंवा अहवालांविरोधात कारवाई करत आली आहे. यामुळे बाजारात हेराफेरी करणारे निराश होतील. यांच्या सल्ल्यानुसार शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करता येईल. सामान्य गुंतवणूकदारांनी टिप्स देणाऱ्या तज्ज्ञांची विश्वासार्हता पारखावी. नंतरच त्यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. असा सल्ला घेऊन इंट्राडे ट्रेडिंग किंवा वायदा आणि पर्यायात (एफअँडओ) पैसा गुंतवणे टाळावे. गुंतवणूकदारांनी स्वत:च शेअरची निवड करावी.

काय आहे फ्रंट रनिंग... एखाद्या कंपनीच्या शेअरची मोठी खरेदी केल्यानंतर तज्ज्ञ टीव्ही किंवा वृत्तपत्रात त्याच कंपनीचे शेअर खरेदीचा सल्ला देतात. यालाच फ्रंट रनिंग म्हणतात. एक्स्पर्ट सुचेता दलाल, मनी मार्केट तज्ज्ञ (यांनी हर्षद मेहता घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता)

बातम्या आणखी आहेत...