आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे टीकास्त्र:भाजपचे नेते म्हणजे मविआवर टीका करताना पोपट अन् सामान्यांसाठी आवाज उठवताना वाळूत तोंड खुपसून बसणारे शहामृग, रोहित पवारांचा निशाणा 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडीवर सातत्याने होणारी टीका आणि इंधन दरवाढीवरून त्यांनी ट्विट करत भाजप नेत्यांना घेरले आहे.

राज्यावर सध्या कोरोनाचं संकट आ वासून उभं आहे. मात्र राज्यातील राजकारणही तापलं आहे. विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीव सातत्याने टीका केली जात असते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या तीन चाकी सरकारमध्ये कुरबुरी असल्याच्या चर्चा विरोधकांकडून केल्या जातात. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. या सरकारमध्ये विश्वास नाही असेही वारंवार बोलले जाते. तसेच सध्या इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. या दोन विषयांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीवर सातत्याने होणारी टीका आणि इंधन दरवाढीवरून त्यांनी ट्विट करत भाजप नेत्यांना  घेरले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीवर राजकीय टीका करताना पोपटासारखे बोलणारे राज्यातील भाजपचे सर्व नेते सामान्यांसाठीच्या महत्त्वाच्या इंधन दरवाढीवर मात्र न बोलता वादळात वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या शहामृगाच्या भूमिकेत जातात. केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता? आता तिथे का शांत बसता याचं स्पष्टीकरण जनतेला द्या, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

बातम्या आणखी आहेत...