आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती:'विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हटलं', आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा, शेअर केले मोदींचे 'हे' पोस्टर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिजेलच्या किंमती सातत्याने वाढत आहे. आजही पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारव निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत पेट्रोल डिजेलच्या वाढत्या किंमतींवर रोष व्यक्त केला. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पोस्टरही शेअर केले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळातील हे पोस्टर आहे. 

गेल्या काही दिवसांतील महसुली तोटा भरून काढता यावा यासाठी तेल कंपन्या प्रयत्न करत आहे. याच कारणामुळे पेट्रोल, डिझेलचे दर काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीसारख्या शहरात डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झालं आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पोस्टर शेअर करत आव्हाड म्हणाले की, आज पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये झाली आहे. ही होर्डींग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती. विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल" असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे. 

बातम्या आणखी आहेत...