आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ब्रिटीशराज:जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि जो आंदोलन करतो त्याला शिक्षा; आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे संतप्त

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''राज्यात नेमकं चाललय काय? ब्रिटीशराज सुरू आहे. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि जो एखादे आंदोलन करतो त्याला शिक्षा. यातून ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवले. अशी तिखट प्रतिक्रिया माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

पोलिसांवर वरून दबाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'हर हर महादेव' हा चित्रपट बंद पाडल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुळे म्हणाल्या की, त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलिस स्टेशनला बोलविण्यात आले होते. मात्र, ते पोलिस ठाण्यात गेल्यावर असे समजेल की, पोलिस कर्मचाऱ्यांवर वरून दबाव येतोय. यात पोलिस कर्मचाऱ्यांची कुठलीच चूक नाही. महाराष्ट्र पोलिसांना कोणाचे फोन येतात अशा होणाऱ्या चर्चेला नाकारता येत नाही.

अटकेचे मनापासून स्वागत

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात काही चुकीचे दाखवण्यात येत असेल आणि त्याला एखाद्या व्यक्तीने विरोध केल्यास त्याला अटक होणार असेल तर या अटकेचे मनापासून स्वागत करतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हा सर्वांना या कामासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असे सुप्रियाताईंनी स्पष्ट केले. या कामासाठी जितेंद्र आव्हाड यांना अटक होत असेल तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे. या प्रकरणात सरकारने उत्तर दिले पाहिजे की, राज्य सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे. जर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात असेल तर ही लढाई पूर्ण ताकदीने लढू असा इशाराही सुप्रियाताईंनी राज्य सरकारला दिला.

बातम्या आणखी आहेत...