आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:आषाढी वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी अडीच कोटींचा निधी

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी २ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. वारीला पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत विविध संतांच्या पालख्या जात असतात. वारकऱ्यांना सोयी सुविधांसाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना पुणे, सातारा, व सोलापूर या जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींच्या मागणीच्या ५० टक्के रक्कम उपलब्ध करून द्यावी. उर्वरीत ५०%रक्कम ग्राम विकास विभागाने संबंधित जि. परिषदेकडे उपलब्ध करून द्यावी असा निर्णय या बैठकीत घेतला.

बातम्या आणखी आहेत...