आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगडोंब:जोगेश्वरीत फर्निचर दुकाने, मालाडला झोपडपट्टी खाक, सुदैवाने दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत सोमवारी दोन ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मालाडमधील कुरार आप्पापाडा परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागली. आगीत कुणीही जखमी झाल्याची किंवा अडकल्याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यात अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घरगुती सिलिंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच मुंबईतील जोगेश्वरी भागातील एका फर्निचर दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अप्पापाडा झोपडपट्टीत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लेव्हल-थ्री आग लागली. या परिसरातून धुराचे लोट काही किलोमीटर दूरवरून दिसत होते. अग्निशमन अधिकाऱ्यांना संध्याकाळी ४.५२ वाजेच्या सुमारास आनंद नगरमध्ये आग लागल्याचा पहिला कॉल आला. ही आग बृहन्मुंबई म्युनिसिपिकल कॉर्पोरेशनने लेव्हल १ ची असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती लेव्हल २ असल्याचे सांगितले.

फर्निचरची दुकाने खाक सोमवारी सकाळी जोगेश्वरीतील रिलीफ रोडवर असलेल्या घास कंपाऊंडमधील फर्निचर मार्केटमधील एका गोदामाला सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग मोठी असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे १२ बंब, ६ जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात आली असली तर यात तब्बल २० ते २५ फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...