आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी रणनीती:गडकरींकडे 7 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी, मंत्री राणेंेकडे केवळ एकच जिल्हा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील १७ लोकसभेच्या जागांसाठी नवी रणनीती तयार केली आहे. या नव्या रणनीतीअंतर्गत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सर्वाधिक सात लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रावसाहेब दानवे पाटिल, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांची प्रत्येकी दोन मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे फक्त एकच सांगली मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ. पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई, नारायण राणे यांच्याकडे सांगली, रावसाहेब दानवेंकडे लातूर व मावळ. डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी व धुळे, डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक आणि कपिल पाटील यांच्याकडे रावेर आणि सोलापूर देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...