आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेकडून शिवसेनेच्या सभेवर टीका करणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा. मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज आम्ही बंद करू अशी घोषणा आज कराच असे गजानन काळे यांनी म्हटले आहे. तर एक व्हिडिओ टविट करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दबाव झुगारण्याची हिम्मत करा असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील एका कार्यक्रमात जाहीर सभा घेत नवहिंदुत्व वाद्यांचा मास्क काढून समाचार घेणार असल्याचे म्हटले होते. तर शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा असून त्यांच्या सभेपूर्वी मनसेने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी शिवसेनेचा संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यातून त्यांनी शिवसेनेचे हिंदुत्व आणि मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येसह रझा अकादमीच्या कार्यक्रमाचे देखील फोटो वापरत शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या सभेत होणारा शब्द प्रयोगाची टिंगल उडवली आहे.
शिवसेनेकडून सभेची जोरदार तयारी
मुंबई मनपाच्या तयारीसाठी सर्वपक्ष कामाला लागले आहेत. भाजपने पोलखोल यात्रा सुरू करत मुंबई मनपासाठी तयारी सुरू केली आहे. तर राज ठाकरेंनी 15 मनपाच्या तयारीसाठी मुंबई, ठाणे, आणि औरंगाबादेत सभा घेतल्या आहेत तर पुण्यात संघटनात्मक काम सुरू केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी 1 मे रोजी मुंबईत सभा घेत मनपासाठी रणशिंग फुंकले होते. आज शिवसेनेची सभा होणार असून त्यात मुंबई मनपाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यामुळे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.
गजानन काळेंनी शिवसेनेविरोधात आक्रमक पणे ट्विट करत शिवसेनेवर हिंदुत्वावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. यातच त्यांनी भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना टविट करत खोचक टोला लगावला आहे. पाहूयात नेमके काय आहे गजानन काळेंचे ट्विट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.