आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना धमक्या:‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटावरुन हल्ल्याची भीती, संतोषी यांचे मुंबई पोलिसांना पत्र

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘गांधी गोडसे एक युद्ध’या चित्रपटाचे प्रमोशन व प्रदर्शन रोखावे म्हणून मला धमक्या मिळत आहेत. , असे पत्र या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांना लिहिले आहे.

तसेच, धमक्यांमुळे मला भीती वाटत आहे. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाची सुरक्षा वाढवावी, अशी मागमीही दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी पत्रात केली आहे.

पत्रकार परिषदेत गोंधळ

राजकुमार संतोषी यांना ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल 9 वर्षांनी पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनचा कार्यक्रम व पत्रकार परिषद सुरू असताना काही जणांनी आंदोलन केले होते. तसेच काळे झेंडे दाखवत कार्यक्रम बंद पाडला होता. 20 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे.

अज्ञात लोकांकडून धमक्या

पत्रात राजकुमार संतोषी यांनी म्हटले आहे की, ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमच्या टीमने 20 जानेवारी 2023 रोजी PVR, सिटी मॉल, अंधेरी येथे दुपारी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेतच एका गटाने गोंधळ घातला. त्यानंतर काही अज्ञात लोकांनी मला धमक्या दिल्या.

तातडीने सुरक्षा पुरवावी

राजकुमार संतोषी यांनी पुढे म्हटले आहे की, ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावेव प्रमोशन करु नये, अशा धमक्या मला अज्ञातांकडून मिळाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष केले तर माझ्यासह माझ्या कुटुंबीयांवर हल्ला होऊ शकतो. हल्ल्यात मी, माझे कुटुंबीय गंभीर जखमी होऊ शकतो. त्यामुळे माझे आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांचे रक्षण करण्यासाठी मला तातडीने अतिरिक्त सुरक्षा पुरवावी.

राजकुकमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेले पत्र.
राजकुकमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेले पत्र.
बातम्या आणखी आहेत...