आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्माजींचे पणतू तुषार गांधींचा आरोप:सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी गोडसेला बंदूक पुरवली

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी बंदूक पुरवली, असा गंभीर आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी विरुद्ध सावरकर असा वाद पेटण्याची शक्यताय.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच भारत जोडो यात्रेत सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली असा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाची एकच राळ उडाली. आता या वादात तुषार गांधी यांनी ट्विट करून उडी घेतलीय.

काय केला आरोप?

तुषार गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक पुरवली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत गोडसेकडे हत्या करण्यासाठी शस्त्र नव्हते, असे गांधी यांनी म्हटले आहे.

अनेक हल्ले झाले

तुषार गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रबोधनकारांच्या एका इशाऱ्याचाही दाखला दिलाय. ते म्हणतात की, बापूंवर 1930 च्या दशकामध्ये हल्ल्याचे अनेक प्रयत्न झाले. स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला, विदर्भात त्यांच्या हत्येचा कट रचल्याची गेल्याची पूर्वसूचना दिली. त्यामुळे बापूंचे प्राण वाचवले.

प्रबोधनकारांची आठवण

प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंवरील खुनी हल्ले रोखण्यासाठी सनातनी हिंदू संघटनांच्या महाराष्ट्रातील नेतृत्वांना जाहीर इशारा दिला. तेव्हा त्यांचा रोख सावरकर आणि हेडगेवार यांच्याकडेच होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या या इतिहासाची आठवण करून दिली पाहिजे.

इतिहासातच हेच सांगितले

तुषार गांधी याबाबत प्रसारमाध्यमांशीही बोलले. त्यात ते म्हणाले, मी इतिहासात जी नोंद आहेत, तेच सांगत आहे. हा आरोप नाही. इतिहासात हेच सांगितले आहे. पोलिसांच्या 'एफआयआर'मध्येही तशी नोंदय.

सावरकर-गोडसे भेटले

तुषार गांधी म्हणाले की, 26 आणि 27 जानेवारी 1948 च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरला. मात्र, या भेटीनंतर ते थेट दिल्लीला गेले. तिथून ग्वाल्हेर गाठले. तिथे सावरकवादी परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडले. मी हेच सांगितले. नवीन आरोप केलेला नाही.

संबंधित बातमीः

गांधीजींच्या पणतूंचे आरोप हास्यास्पद:सावरकर अभ्यासक बावस्कर म्हणाले - नथुरामाचे उत्तर तुम्ही वाचले नसावे म्हणजे कमालच!

बातम्या आणखी आहेत...