आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदावर्तेंचे वादग्रस्त वक्तव्य:म्हणाले - गांधीवादाने महाराष्ट्रासह देशाची फसवणूक केली, नव्याने वाद होण्याची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केले असून गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा “नथुरामजी’ असा उल्लेख केला. यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे.

गुणरत्न सदावर्तें म्हणाले की, गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षड‌्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला. सदावर्ते यांनी “एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापना केली आहे. याची अधिकृत घोषणा त्यांनी सोमवारी केली. सदावर्ते यांनी या वेळी “जय श्रीराम’ अशा घोषणादेखील दिल्या. त्यामुळे आता सदावर्ते यांच्या या वक्तव्यावरूनही नव्याने वाद होण्याची शक्यता असल्याचेही अनेक जण सांगत आहेत.

बातम्या आणखी आहेत...