आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव 2020:गणपती बाप्पाचे विसर्जन थेट चौपाटी आणि तलावांमध्ये करता येणार नाही, 'या' आहेत पालिकेच्या मार्गदर्शक सूचना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज घराघरात गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. कोरोनामुळे यंदा उत्साह थोडा कमी असला तर नियम व अटी लक्षात घेत हा सण साजरा करण्यात येत आहे. या काळात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिकेने अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

चौपाटी, तलाव अशा 70 नैसर्गिक विसर्जनस्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासोबतच गर्दी टाळण्यासाठी आज पुन्हा पालिकेकडून या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यभरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करत असणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे असे आवाहान वारंवार केले जात आहे. हे शक्य नसल्यास नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेने 24 विभागांमध्ये सुमारे 170 कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. कृत्रिम तलावांजवळ राहणाऱ्या भाविकांनी त्याचा वापर करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावे लागणार आहे किंवा विसर्जन पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सिल इमारतींमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...