आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सव:गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा उंच नको, शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करावा : मुख्यमंत्री

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये
Advertisement
Advertisement

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सर्व येणारा गणेशोत्सव नियम पाळून साधेपणाने साजरा करूया. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची नव्हे तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले. सार्वजनिक मंडपांत ४ फुटांपर्यंतच्या प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे.’

Advertisement
0