आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यंदाचा गणेशोत्सव:सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या जारी, घरची गणेशमूर्ती दोन फुटांची; मिरवणुका काढण्यास मनाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंडपांमध्ये थर्मल स्क्रीनिंग मंडळांची जबाबदारी

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले अाहे. घरांमध्ये गणपती मूर्ती दोन फुटांची असावी तसेच घरातील गणेशमूर्ती शक्यतो धातू अथवा संगमरवरी असावी. त्याचप्रमाणे श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत अशा सूचना केल्या आहेत.

येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची उंची चार फूट असावी आणि घरगुती मूर्तीच्या उंचीवर दोन फुटांचे बंधन असेल. गणेश मंडळांना मनपा व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार परवानग्या घ्याव्या लागतील. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे. अारती, भजने, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

मंडपांमध्ये थर्मल स्क्रीनिंग मंडळांची जबाबदारी : श्री गणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक व वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले असून गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रीनिंगची पुरेशी व्यवस्था गणेश मंडळांना करावी लागणार आहे.

0