आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत गणेश विसर्जनाची धूम:मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात, स्मृती इराणींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश गल्लीतील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.

मुबंईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या शेजारीच गणेश गल्लीत मुंबईचा राजा विराजमान आहे. तब्बल 150 वर्ष जुने हे मुंबईतील सर्वात जुने मंडळ आहे. त्यामुळेच विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान या मंडळाला मिळतो.

बोरिवलीतील उपनगरचा राजा मंडळाची निघालेली मिरवणूक.
बोरिवलीतील उपनगरचा राजा मंडळाची निघालेली मिरवणूक.

मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीत जवळपास 5 हजार भक्त सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली आहे.

मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाल्यानंतर थोड्याच वेळाने या मंडळांच्याही मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरूवात झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

15,500 पोलिस तैनात

गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी

तसेच, आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे. सूट देण्यात आलेल्या वाहनांमध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांचा समावेश आहे

बातम्या आणखी आहेत...