आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन, मिरवणुकीत कोरोना नियम धाब्यावर; गर्दी हटवण्यासाठी मुंबई पोलिसांची कसरत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लालबागच्या राजासह सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी भक्तांना विसर्जनाच्या वेळी गर्दी वाढवू नये अशी विनंती केली आहे.

आज अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन आहे. सर्वत्र गणेश भक्त बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पासह प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या केवळ 10 कार्यकर्त्यांना विसर्जनासाठी जाण्याची परवानगी आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणुकीत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

लालबागच्या राजासह सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी भक्तांना विसर्जनाच्या वेळी गर्दी वाढवू नये अशी विनंती केली. पोलिसही लोकांना गर्दी वाढवू नये असे आवाहन केले. पोलिसांच्या उपस्थितीत मुंबईत 'लालबागचा राजा'च्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांनी गर्दी केली. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला होता. दरम्यान चौपाटीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच गणेशभक्तांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...