आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ganeshotsav In Maharashtra News And Updates: Morning Aarti Held In All Major Ganesh Mandals, Section 144 Imposed In All Major Cities Including Mumbai Pune

गणेशोत्सव सुरू:सर्व प्रमुख गणेश मंडळांमध्ये झाली सकाळची आरती, मुंबई-पुण्यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये कलम 144 लागू, गर्दी नियंत्रित करण्यासाठी ड्रोनद्वारे ठेवली जात आहे नजर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यमंत्र्यांनी लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे

मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा गणपती, पुण्याचा दगडूशेठ गणपती यासह सर्व प्रमुख पंडालमध्ये सकाळची आरती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणांवर बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठा होणार आहे. दरम्यान, संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, पंडालमध्ये सामान्य लोकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जवळजवळ सर्व प्रमुख गणेश पंडालमध्ये 24 तास बाप्पाच्या लाइव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले जाऊ शकते.

मुंबई, पुण्यात कलम 144 लागू
पुढील 10 दिवस सुरू राहणारा गणेशोत्सव पाहता मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी 5 हून अधिक लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व प्रमुख शहरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून मुंबईकरांना साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नगराळे म्हणाले, ' गणपतींच्या पंडालमध्ये कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या 5 लोकांना पूजा-अर्चासाठी आणि गणपती विसर्जनदरम्यान 10 लोकांना जाण्याचू सूट देण्यात आली आहे. पोलिस साध्या गणवेश आणि गणवेशात पूजा पंडाल, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी आणि इतर ठिकाणी सज्ज असतील. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग किंवा कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कलम 188 (महामारी कायदा) अंतर्गत दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईत 35 हजार पोलिस तैनात
सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे गणेश पंडालवर लक्ष ठेवले जात आहे जेणेकरून नियमांचे पालन केले जाईल. याशिवाय डॉग स्क्वॉड, बीडीडीएस, क्यूआरटी इत्यादींना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. 35 हजारांहून अधिक पोलिस सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहेत, तर 3 ते 4 हजार अतिरिक्त पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या वतीने, सर्व क्षेत्र, झोन, पोलिस स्टेशन आणि सुरक्षा यंत्रणेशी संबंधित सर्व एजन्सींशी बोलल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली
सागरी पोलिस आणि कोस्टल पोलिसांच्या मदतीने समुद्र किनाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. वॉच टॉवर आणि दुर्बिणीद्वारे समुद्राचे निरीक्षण केले जात आहे. शहरात ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, पोलिसांसाठी ही दिलासादायक बाब आहे की कोरोना मार्गदर्शक तत्वे आणि कलम 144 च्या अंमलबजावणीमुळे पूर्वीच्या गणेशोत्सवाप्रमाणे या वेळी कमी लोक रस्त्यावर दिसतील. असे असूनही, मुंबई पोलिस अतिरिक्त दक्षता घेत आहेत.

डीसीपी एस चैतन्य म्हणाले की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. तो दहा दिवस साजरा केला जातो. या दरम्यान गणपतीच्या मूर्ती पाहण्यासाठी आणि विघ्नहर्ताचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गणपतीच्या पंडालमध्ये जमतात. यामुळे कोविड विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या संदर्भात, महाराष्ट्र सरकारनेही लोकांना या वेळी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकांना कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ओणम सण दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने केरळमध्ये अलीकडेच रुग्णांची संख्या वाढली आहे. म्हणूनच सणांच्या हंगामामुळे, महाराष्ट्र सरकार देखील अनेक खबरदारीच्या उपाययोजना करत आहे.

सुमारे 3500 ते 4000 वाहतूक पोलिस देखील सुरक्षा व्यवस्था हाताळण्यात गुंतलेले आहेत. सागरी पोलिस आणि कोस्टल पोलिसांच्या मदतीने समुद्राच्या किनाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. वॉच टॉवर आणि दुर्बिणीद्वारे समुद्राचे निरीक्षण केले जात आहे. शहरात ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी आहे. तथापि, पोलिसांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे की कोरोना मार्गदर्शक तत्वे आणि कलम 144 च्या अंमलबजावणीमुळे पूर्वीच्या गणेशोत्सवाप्रमाणे या वेळी कमी लोक रस्त्यावर दिसतील.

बातम्या आणखी आहेत...