आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Gang Rape In Bhandra | Bhandara Rape Update | Gang Rape Of Woman On The Pretext Of Help; The Victim Is Serious, Undergoing Treatment In Nagpur

महाराष्ट्र पुन्हा हादरला:मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार; पीडितेची प्रकृती गंभीर, नागपुरात उपचार सुरू

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदतीचे आश्वासन देऊन एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्या जिल्ह्यात घडली आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर नराधमांनी पीडितेला रस्त्याकाठी फेकून देऊन पळ काढला. सध्या पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त होती. त्यामुळे ती बहिणीकडे राहण्यासाठी गोंदिया या ठिकाणी आली होती. दोन्ही बहिणीत 30 जुलै रोजी भांडण झाल्यानंतर ती रात्रीच्या सुमारास बहिणीच्या घरातून निघून गेली. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्याने दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला.

वारंवार अत्याचार

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांनी देखील पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.

प्रकरण गोंदिया पोलिसांकडे

पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिले. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केले. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.

उपचार सुरू

बलात्कार झालेल्या विवाहितेवर सध्या नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी बोलताना सांगितले की, तिच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या तिला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...