आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालघरमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. माहीममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठही आरोपींना अटक केली आहे.
शुक्रवारपासून मुलगी बेपत्ता
याप्रकरणी पालघरमधील सातपाटी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, शनिवारी (ता. 17) दुपारी दोन वाजेच्या सुमारास माहीम पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या वडिलांनी त्यांची 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच, तिच्याशी फोनवर संपर्क साधला असता ती रडत असल्याचेही अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. शनिवारी सायंकाळपर्यंत अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर मुलीने घडलेला प्रसंग सांगतिला.
मित्रानेच निर्जनस्थळी बोलावले
पीडितेने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी रात्री आठ वाजता तिच्या एका मित्रानेच तिला माहीम परिसरातील पाणेरी येथे निर्जन स्थळी बोलावले. त्यानंतर आठ जणांनी शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. मित्रानेच घडवून आणलेल्या या अत्याचारानंतर पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नशेच्या आहारी
दरम्यान, अत्याचारात सहभागी सर्व आरोपी हे पालघर तालुक्यातील आहेत. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याची माहिती आहे. तसेच, काही आरोपी अल्पवयीन असल्याचीही माहिती आहे. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.