आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:छोटा शकीलच्या लहान बहिणीचा रुग्णालयात मृत्यू, हार्ट अटॅकची शंका; कोरोना चाचणी देखील केली जाऊ शकते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फहमिदा यापूर्वी दुबईमध्ये राहत होती, 2006 मध्ये ती मुंबईत शिफ्ट झाली
  • सूत्रांच्या माहितीनुसार छोटा शकील मुंबईत आरिफ आणि कुटूंबाशी बोलला आहे

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची छोटी बहीण फहमीदा (50) हिचा बुधवारी दुपारी तीन वाजता मुंबईत रुग्णालयात मृत्यू झाला. हार्टअटॅकने आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचे छोटा शकीलकडून सांगण्यात आले आहे. परंतु सर्वजण तिच्या मेडिकल रिपोर्टची प्रतिक्षा करत आहेत. फहमीदा आधी दुबईत राहत होती. 2006 मध्ये ती मुंबईला शिफ्ट झाली होती. 

होऊ शकते कोरोना टेस्ट 

सुत्रांनुसार, छोटा शकीलने मुंबईत आरिफ आणि कुटुंबासोतब चर्चा केली. फहमीदा मृत्यू मुंबईतील टूंगा रुग्णालयात झाला. प्रोटोकॉलनुसार पोस्टमॉर्टम दरम्यान फहमीदाची कोरोनाची चाचणी देखील होऊ शकते.  छोटा शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सर्वात जवळचा समजला जातो. तो पाकिस्तानात लपलेला असल्याचे मानले जाते. 

अंत्यविधीवर गुप्तचर विभाग लक्ष ठेवणार

अंडरवर्ल्ड सुत्रांनुसार, फहमीदा छोट शकीलच्या जवळची होती. या कारणामुळे गुप्तचर विभाग तिच्या अंत्यविधीवर लक्ष ठेवेल. चार बहिणींमध्ये फहमिदा सर्वात लहान होती. 2011 मध्ये शकीलचे वडील बाबुमिया शेखचे वयाच्या 83 वर्षी जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हे कुटुंब दक्षिण मुंबईतील टँकर मोहल्ला भागातील इस्माईल बिल्डिंगमध्ये राहत होते.

बातम्या आणखी आहेत...