आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गँगस्टर रवी पुजारी मुंबई दाखल:2016 च्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात रवी पुजारीविरोधात 49 खटले दाखल आहेत

मंगळवारी सकाळी गँगस्टर रवी पुजारीला कर्नाटकवरुन मुंबईत आणण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने वैदकीय चाचणी केल्यानंतर त्याला मुंबईतील मकोका न्यायालयात कस्टडीसाठी सादर करण्यात आले होते. येथे सुनावणी झाल्यानंतर त्याला 9 मार्चपर्यंत गुन्हे शाखेच्या कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे. रवी पुजारीवर महाराष्ट्रात एकूण 49 खटले दाखल असून, यातील 26 प्रकरणे मकोका अंतर्गत आहेत.

गुन्हे शाखा रवी पुजारीची 21 ऑक्टोबर 2016 मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात चौकशी करत आहे. गुन्हे शाखेच्या वसूली विरोधी पथकाने रवी पुजारीला अटक केले आहे. पुजारीचे सात साधीदार आधीपासूनच तुरुंगात कैद आहेत.

कर्नाटक हायकोर्टाकडून मिळाली मुंबईला नेण्याची मंजूरी

कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर गँगस्टर रवी पुजारीची कस्टडी मुंबई पोलिसांना देण्यात आली. मुंबईचे संयुक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भरंबे म्हणाले की, पुजारीची कस्टडी मिळवण्याच्या दिशेने ही खूप मोठे यश आहे.

पुजारीला दक्षिण आफ्रीकेत पकडले होते

रवी पुजारी मागील अनेक वर्षांपासून फरार होता. त्याला मागच्या वर्षी दक्षिण आफ्रीकेतील सेनेगलमधून अटक करुन भारतात आणले होते. कर्नाटकातील उडुपीचा रहिवासी असलेला रवी पुजारी परदेशातून वसुलीचे रॅकेट चालवायचा. यातून तो मोठे व्यवसाय करणारे, सेलिब्रिटी आणि इतर श्रीमंत लोकांना टार्गेट करायचा.

अनेक राज्यात खटले दाखल

रवी पुजारीविरोधात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात हत्या, हत्येचा प्रयत्न, वसुली इत्यादी प्रकरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. साल 2000 मध्ये त्यांने आपल्या गँगमध्ये भरत नेपाली, हेमंत पुजारी, विजय शेट्टीला सामील केले होते.

बातम्या आणखी आहेत...