आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल डीझेलनंतर आता गॅसचा भडका:घरगुती वापराच्या गॅसच्या किमती 25 रुपयांनी वाढवल्या, यावर्षी 2 महिन्यात 125 रुपयांनी महागले गॅस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ घरगुतीच नव्हे तर कमर्शिअल सिलेंडरच्या किमती सुद्धा वाढल्या

पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसने सुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता सबसिडी नसलेला LPG सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपये एवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी जे सिलेंडर 694 रुपयांना मिळत होते ते आता 819 रुपयांवर पोहोचले आहे.

फेब्रुवारीत तीनदा महागले
फेब्रुवारी महिन्यात घरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यात 50 रुपयांची आणि 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ केली. अर्थात एका महिन्यातच सिलेंडरचे भाव 100 रुपयांनी वाढवण्यात आले.

डिसेंबरपासून आतापर्यंत 225 रुपयांनी महागले
1 डिसेंबर 2020 रोजी गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवरून 644 करण्यात आली. 1 जानेवारी रोजी त्यात पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एक घरगुती स्वयंपाकाचे सिलेंडर 694 रुपयांत येत होते. मग फेब्रुवारी महिन्यात तीनदा एकूणच 100 रुपये वाढवण्यात आले. अशा प्रकारे 25 फेब्रुवारी रोजीच गॅस सिलेंडरची किंमत 794 रुपये झाली. आता 1 मार्चपासून आणखी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून घरगुती LPG च्या वर्षातून 12 टाक्यांवर सबसिडी अर्थात सवलत दिली जाते.

कमर्शिअल सिलेंडरच्या किमती सुद्धा वाढल्या
19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या किमती सुद्धा 90.50 रुपयांनी महागल्या आहेत. दिल्लीत आता कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1614 रुपये तर मुंबईत 1563.50 रुपये करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...