आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात LPG लीक:मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस लीकनंतर रुग्णांना बाहेर काढले; कुठलीही जीवित किंवा वित्त हानी नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळतीने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. (फाइल फोटो) - Divya Marathi
कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळतीने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. (फाइल फोटो)

येथील कस्तुरबा रुग्णालयात LPG लीक झाल्याने शनिवारी एकच गोंधळ उडाला. मीडिया रिपोर्टनुसार, यासंदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. चिंचपोकळी येथील आर्थर रोड परिसरात असलेल्या या रुग्णालयातील गॅसच्या पाइपलाइनमधून गळती झाली. यानंतर रुग्णांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीला कुठल्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तीय हानीचे वृत्त नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की चिंचपोकळी येथे असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात सकाळी साडे अकराच्या सुमारास वायू गळती झाली. रुग्णालयात असलेल्या LPG पाइपलाइनमधून ही गळती झाली. यानंतर कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णांसह सर्वांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील गळतीची पाहणी केली. सुदैवाने ही गळती मोठी नव्हती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...