आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपघात:मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात, गॅस टँकर आणि क्रेनची धडक, महामार्गावर 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही धडक एवढी भीषण होती की क्रेनचा चुराडा झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रोपोलीन गॅसचा टँकर आणि एका क्रेनचा भीषण अपघात झाला. रात्री 12 वाजेची दरम्यान महामार्गावरील आंबोली येथे हा अपघात झाला. भरधाव क्रेन आणि गॅस टँकरमध्ये धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की क्रेनचा चुराडा झाला आहे.

या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अपघातामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. तर वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या.

अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक पोलिसही तात्काळ दाखल झाले. पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जात. आहेत ठप्प झालेली वाहतूक महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन संथगतीने सुरु केली जात आहे. तसेच या भीषण अपघताता क्रेनचा चुराडा झाला. क्रेन महामार्गावरुन हटवण्यात येत आहे.

प्रोपोलिन गॅस टँकर क्र. जी. जे. 06 ए. झेड. 6989 गुजरातकडे जात होते. याच वेळी टँकरने आंबोली ब्रिजवर क्रेनला मागून जोरदार धडक दिली. यामुळे वाहणांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच रस्ताही ब्लॉक झाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही.