आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसचा टँकर उलटला:मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकर उलटला, 3 तास वाहतूक विस्कळीत

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोरघाटातून उतरताना हा अपघात झाला

पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्रॉपेलेन गॅस असलेला टँकर खोपोली हद्दीत उलटल्याची घटना सोमवारी घडली. हा टँकर रस्त्यावर तिरपा पडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक यामुळे विस्कळीत झाली होती. बोरघाटातून उतरताना हा अपघात झाला.

खोपोली हद्दीत पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्रॉपेलेन गॅस असलेला टँकर उलटल्याची घटना सोमवारी घडली. टँकर रस्त्यावर तिरपा पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे विस्कळीत झाली होती. टँकरमधील वायू अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे सावधनता बाळगून टँकरपासून सुरक्षित अंतर ठेवण्यात आले. बोरघाटातून उतरताना हा अपघात झाला आहे.

गॅस गळती रोखण्यासाठी एक्सप्रेस वेवरील सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या. खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपच्या सदस्यांनी ग्रुपमधील औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची मदत घेतली. त्यानुसार ‘प्रोपिलीन’ गॅसचे मटेरील सुरक्षा डाटा सीटचा अभ्यास करून रणनिती ठरविण्यात आली. उलटलेल्या टँकरवर पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्यात आले व गॅस निकामी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व आवश्यक सुरक्षा साधनांचा उपयोग करून टँकरमधून होणारी गॅस गळती बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आलेत. यासाठी रिलायन्स कंपनीतील विशेष टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच परिसरातील अन्य कारखान्यांमधील सुरक्षा अधिकारी व त्यांच्या टीमचीही मदत घेण्यात आली. दरम्यान, गळतीने दाब कमी होऊन लिकेज कमी होत धोका कमी झाल्यावर स्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या सर्व घडामोडीत तीन तास उलटले. या दरम्यान एक्सप्रेसवरील वाहतूक मुंबई-पुणे जुन्या महा मार्गावर वळविण्यात आली होती. वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने संभाव्य धोका टाळण्यात यश मिळाले.

बातम्या आणखी आहेत...