आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील काही दिवस गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद:रायगडमधील संशयास्पद बोटीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, 26/11 चा गेटवे साक्षीदार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील सुप्रसिद्ध 'गेटवे ऑफ इंडिया' काही दिवसापर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडमध्ये हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सहा दिवसांपूर्वीच एक संशयास्पद बोट सापडली होती. त्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला होत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील काही दिवस 'गेट वे ऑफ इंडिया' बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत हा गेट बंदच राहणार आहे.

सहा दिवसांपूर्वी रायगडच्यास हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर 'माय लेडी हान' नावाची संशयास्पद बोट सापडली होती. त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ही संशयास्पद बोट सापडल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया' पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

गेटवे घटनेचा साक्षीदार

गेट वे ऑफ इंडिया हे 26/11 दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार आहे. त्याच्या समोर असलेल्या 'ताज पॅलेस' या हॉटेलवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दहशतवादी समुद्री मार्गावरून मुंबई घुसल्याचे सांगितले जाते. दरम्यान हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोट प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने आर्म्स अॅक्ट अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र एटीएस या प्रकरणी संबंधित कंपनीशी बातचीत करुन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एटीएसने आतापर्यंत कोणतीही थिअरी फेटाळलेली नाही.

हरेश्वर किनाऱ्यावर बोट

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर मागील आठवड्यात गुरुवारी (18 ऑगस्ट) सकाळी 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रे सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या संशयास्पद बोटीचे नाव 'लेडी हान' असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन 'अ‍ॅसॉल्ट रायफल', स्फोटके आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...