आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकांची तयारी:मनसेकडून राज्यभरात 'घे भरारी' अभियान; प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मेळावे, सभा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी पालिका तसेच विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी तयारी सुरू केली आहे. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात 'घे भरारी' अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मेळावे, सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

महाप्रबोधन यात्रेला प्रत्युत्तर

दरम्यान, ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच, मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही जागर मुंबईचा हे अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आपली जागा निर्माण करण्यासाठीच मनसेतर्फे हे अभियान राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे.

मूळ समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणार

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार 'घे भरारी' हे अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मेळावे आणि सभा घेतल्या जाणार आहेत. मूळ प्रश्नांना भरकवटण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून केला जात आहे. जनतेच्या मुळ समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यासाठी आवाज उठवण्यासाठी'घे भरारी' अभियान राबवण्यात येणार आहे.

मनसैनिकांना एकत्र करणार

दरम्यान, मनसे प्रमुखराज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय दिसून येत आहेत. राज ठाकरेंनी नुकताच कोकण दौरा करत येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. तसेच, पक्षवाढीसाठी आणि आगामी निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या. आता 'घे भरारी' अभियानाच्या माध्यमातून मेळावे आणि सभांच्या माध्यमातून मनसैनिक एकत्र येणार आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...