आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:सोसायट्यांत कामगारांसह वाहनचालकांना प्रवेश द्या, कारवाई करण्याचा सरकारचा इशारा; अध्यादेश जारी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना झालेल्यांना झिडकारून लावू नका

कोरोनाचा टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. त्यामुळे हाउसिंग सोसायट्यांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना प्रवेश नाकारू नये, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. याबाबत सरकारने एक अध्यादेशही जारी केला आहे.

प्रवेशबंदीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच पुणे येथील अनेक सोसायट्यांत कोरोना रुग्णांबाबत सरकारचे नियम डावलून आपले नियम अमलात आणण्यात येत होते.

कोरोना झालेल्यांना झिडकारून लावू नका

प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्या तसेच इमारतींवर कारवाईचा इशारा सरकारने दिला होता. तसेच कोरोना झालेल्यांना आणि त्यातून बरे होत असलेल्यांना वेगळे वागवल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...