आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील मोदी सरकारने मराठा आरक्षणाच्या आडून केलेली १२७ वी घटनादुरुस्ती ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. जोपर्यंत राज्यघटनेतील ५०% आरक्षणाची लक्ष्मणरेषा दूर केली जात नाही, तोपर्यंत मराठा समाजाला कोणतेही आरक्षण मिळू शकत नाही. आपला पक्ष केंद्राच्या या धुळफेकी घटनादुरुस्तीविरोधात जनजागृती करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. या वेळी मराठा समाजाचा ओबीसी वर्गात समावेश करून त्यांना अारक्षण द्यावे काय, असा सवाल केला. कशातूनही द्या, पण आरक्षण द्या, अशा शब्दांत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, देशातील ९०% राज्यांत ६० टक्क्यांवर आरक्षण सध्या गेलेले आहे. त्यात पुन्हा केंद्र म्हणते आम्ही १२७ वी घटनादुरुस्ती केली, आता राज्यांनी कुणासही मागासप्रवर्ग ठरवून आरक्षण द्यावे. पण, इंद्रा साहनी निवाड्यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मग, नव्याने मागास ठरवलेल्या घटकांना आरक्षण कुठून देणार, असा सवाल त्यांनी केला.
राज्यपाल अन् राज ठाकरेंना टोला
१. विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीचे पत्र राजभवनला गेलेले आहे. कदाचित वाढत्या वयामुळे राज्यपालांच्या ते लक्षात राहिले नसेल.
२. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे लिखाण मुळातून वाचले पाहिजे. त्यातून त्यांचे गैरसमज दूर होतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.