आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Give Good Sense To The Thackeray Government In The State, Bappa Will Decide Whether The Mahavikas Aghadi Government Will Fall Or Not : Narayan Rane

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारायण राणेंचे बाप्पाला साकडे:राज्यातील ठाकरे सरकारला चांगली सद्बुद्धी देवो, महाविकास आघाडी सरकार पडणार की नाही हे बाप्पाच ठरवेल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाप्पांचे आगमन झाले आहे, आता काही दिवस चिमटे नको, थोडे शांत राहु या - नितेश राणे

आज राज्यभरात कोरोना संकटात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकार जाण्याबाबत गणपती बाप्पावर सर्व काही सोपवले आहे. 'महाविकास आघाडी सरकार पडणार की नाही, हे आता बाप्पाच ठरवेल', असे साकडे राणेंनी गणपतीला घातले आहे. ते 'न्यूज18 लोकमत'शी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे हेही उपस्थितीत होते.

नारायण राणे म्हणाले की, ''आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती आहे. राज्यातील कोरोना संकट नष्ट होवो, राज्य प्रगती होवो आणि राज्यातील ठाकरे सरकारला चांगली सद्बुद्धी देवो' असे साकडंच राणेंनी बाप्पाला घातले आहे. तसेच, 'महाविकास आघाडी सरकार हे आज ना उद्या जाणारच आहे. मात्र हे सरकार जाणार की नाही हे बाप्पाच ठरवतील' असेही राणे म्हणाले.

दरम्यान ''आता गणरायाचे आगमन झाले आहे. पुढील पाच दिवस हे फक्त त्यांच्यासाठी असणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांत आता काही दिवस चिमटे नको, थोडे शांत राहु या'' असे नितेश राणे म्हणाले.