आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी युद्ध:खासगी डाॅक्टरांना 50 लाखांचे विमा कवच द्या, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून विमा कवच नाकारले जाते, ही तर असंवेदनशीलता

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी पत्र लिहिले असून त्यांनी खासगी डॉक्टरांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. खासगी सेवेतील डॉक्टरांना विमा कवच नाकारणे असंवेदनशील आहे. या डाॅक्टरांना ५० लाखांचा विमा मिळायला हवा, अशी त्यांनी मागणी केली. राज पत्रात म्हणतात, खासगी डॉक्टरांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. पण त्यांनी सरकारी अनास्था सांगितली, त्याने माझे मन विषण्ण झाले. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरूच ठेवली.

दरम्यान, सरकारने कोविड योद्धे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, मग ते सरकारी असो की खासगी, या सर्वांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचे परिपत्रक सरकारने काढले. मात्र आता खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याचे सरकार नाकारत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील मंदीरासह इतर धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी मनसेकडून लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचे संकेत मनसेकडून देण्यात आले होते.

ही तर असंवेदनशीलता

हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून विमा कवच नाकारले जात असल्याचे कारण दिले जात आहे. पण मुळात हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना, राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत असेल, मात्र त्याच वेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचे आहे, असे राज यांनी ठणकावून सांगितले आहे.