आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 4.0:परप्रांतीय मजुरांच्या रिक्त जागांवर स्थानिकांना नोकरी द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन 4.0 साठी प्रत्येक जिल्ह्याकडून सूचना मागवल्या

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सुरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांना काम उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. १७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे. पावसाळाही लवकरच सुरू होणार असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना  संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल या दृष्टीने खासगी डॉक्टर्सना ते नियमितरीत्या आपल्या सेवा सुरू करतील हे पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत, असे सांगून कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील,  या झोनमधून  विषाणू बाहेर जाणार नाही याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्राथमिक तपासणी हवी

प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...