आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 40 लाखांच्या जवळपास आहे.

देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 40 लाखांच्या जवळपास आहे. अनेक व्हीव्हीआयपींना कोरोनाने विळखा घातला आहे. आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते असिम्टोमेटिक आहेत आणि सध्या होम क्वारंटाइन आहेत. त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंद ट्विट करत म्हणाले की - 'सर्वाना सूचित करु इच्छितो की, मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मी असिम्टोमेटिक आहे आणि यामुळे होम क्वारंटाइन आहे. मी घरातून आपले कर्तव्य पार पडत राहिल. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला मी देईल'

यापूर्वी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आमदार चर्चिल आलेमाव, आमदार सुदिन ढवळीकर अशा राजकीय व्यक्तीही कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या.