आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महारोगराईत पुन्हा एकदा सोन्याला झळाळी मिळाली आहे. देशातील वायदे बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आठ वर्षांच्या उच्च पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज(एमसीएक्स)मध्ये सोन्याचा भाव(ऑगस्ट एक्स्पायरी) बुधवारी ४८,५८९ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढला. ही एक्स्चेंजमध्ये याची सर्वाधिक किंमत आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय वायदे बाजार कॉमेक्सवर सोन्याचा भाव १,७९६ डॉलर प्रतिऔंसपर्यंत उसळला. ऑक्टोबर २०१२ नंतर याचा सर्वात उच्च स्तर आहे. देशातील वायदे बाजार एमसीएक्समध्ये बुधवारी सकाळी सोन्याचा भाव(ऑगस्ट एक्स्पायरी) ४८,३३३ रु. प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. सायंकाळी याचा भाव ४८,०३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला होता. सोन्यात गुंतवणूक करण्याची मागणी सलग वाढत आहे. जगातील सर्वात मोठे सोन्याशी संबंधित एक्स्चेंज ट्रेडेड फंड(ईटीएफ) एसपीडीआर गोल्ड ट्रस्टने सांगितले की, मंगळवारी त्यांची मालकी ०.२८% वाढून १,१६९.२५ टन झाली. हा एप्रिल २०१३ नंतर याचा सर्वाधिक स्तर आहे.
सोने आणखी महाग होणार एंजेल ब्रोकिंगचे डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता म्हणाले,आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत १,७७३ डॉलर प्रतिऔंसपर्यंत आहे. ही ८ वर्षांत याची सर्वाधिक किंमत आहे. देशातील बाजारात ही ४८,४०० पार झाली आहे. कोरोना महासाथीमुळे बहुतांश अर्थव्यवस्थांवर दबाव आहे. दिवाळीपर्यंत देशात बाजारात ही किंमत ५२,००० प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात १८०० ते १८३० डॉलर प्रतिऔंसची पातळी स्पर्श करेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.