आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला. गुरुवारी प्रथमच सोन्याने ५८ हजारांचा टप्पा पार केला. चांदीने १९ महिन्यांनंतर ७१ हजारांचा टप्पा पार केला.
देशांतर्गत बाजारात शुद्ध सोन्याचा (२४ कॅरेट) भाव ९७२ रुपयांनी वाढून ५८,८८२ रु. प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर गेला. २२ कॅरेट सोने ८९० रुपये वधारून ५३,९३६ प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. चांदी २,१३१ रुपयांनी महागून भाव ७१,५७६ रुपये प्रतिकिलो झाला. १९ महिन्यांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी १६ जून २०२१ ला स्पॉट सिल्व्हर ७१,३९३ रुपये होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. त्यानुसार गेल्या २ दिवसांत सोने ३.५५% व चांदी ५.७७% महागली. २४ कॅरेट सोने २,०१७ रु. आणि सोन्याचे दागिने १,८४८रु. प्रति १० ग्रॅमने महागले. चांदीत ३,९०५ प्रतिकिलोने वाढ झाली आहे.उर्वरित. पान ४
विवाह सोहळ्यांमुळे बाजारात वाढती मागणी हे प्रमुख कारण
1. डॉलर इंडेक्स ९ महिन्यांतील नीचांकी.
2. फेडचे दर मंदगतीने वाढण्याचे संकेत
3. जागतिक किंमत ८ महिन्यांच्या उच्चांकावर १९५३.२८ डॉलर प्रति औंस पोहोचली.
4. केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली.
5. जगात मंदीची भीती आहे.
6. जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची भीती.
7. लग्न- समारंभांमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली आहे.
8. औद्योगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढली.
9. आयात शुल्क वाढल्यामुळे चांदी महागली.
गेल्या दोन आठवड्यांत अशी आली तेजी
तारीख शुद्ध सोने दागिने चांदी
१९ जानेवारी ५६,६७० ५१,९१० ६७,४४४
२० जानेवारी ५७,०५० ५२२५८ ६८४५३
२३ जानेवारी ५७,०४४ ५२२५२ ६८२७३
२४ जानेवारी ५७,३२२ ५२५०७ ६८१३७
२५ जानेवारी ५७,१३८ ५२३३८ ६७८९४
२७ जानेवारी ५७,१८९ ५२३८५ ६८१९२
३० जानेवारी ५७,०७९ ५२२८४ ६८१४९
३१ जानेवारी ५६,८६५ ५२०८८ ६७६७१
१ फेब्रुवारी ५७,९१० ५३०४६ ६९४४५
२ फेब्रुवारी ५८,८८२ ५३९३६ ७१,५७६
(स्रोत: इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.