आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 कॅरेट सोन्याचा भाव 57,605 रु./10 ग्रॅम:सोन्याच्या दरात अवघ्या दोन दिवसांत 2,165 रुपये वाढ

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणूकदारांसाठी भरवशाचे असलेले सोने आता किमतीचा उच्चांक गाठण्यासाठी आतुर आहे. मिश्र जागतिक संकेतांमुळे चढ-उतार सुरू असतानाही मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,६०५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. सोन्याच्या दरातील ही वाढ एक आठवड्यापासून लागोपाठ सुरूच आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गेल्या दोन दिवसांमध्ये सोने २,१६५ रुपयांनी, तर पाच दिवसांमध्ये २,६५१ रुपयांनी वधारले आहे.

गुंतवणूक कंपनी मोतीलाल ओसवालचे उपाध्यक्ष (रिसर्च) अमित सजेजा यांच्या मते, सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या वृत्तानंतर अमेरिकन डॉलरच्या दरांवर दबाव आहे. त्यामुळे सोने गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता सांगतात, यूएस फेड व्याजदर जसेच्या तसे ठेवू शकतो. असे झाल्यास सोन्याच्या किमती सार्वकालिक ५८,८४७ प्रति १० ग्रॅम ही उच्च पातळी मोडत नव्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात. आगामी काळात सोन्याचा भाव ६० हजार रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.

{सेन्सेक्स-निफ्टी पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर : शेअर बाजारामध्ये घसरणीची परंपरा मंगळवारी चौथ्या दिवशी सुरूच होती. सेन्सेक्स ३३७ अंकांनी घसरून ५७,९०० वर बंद झाला. निफ्टीदेखील १७,०४३ अंकांवर बंद झाला. ही दोन्हींची पाच महिन्यांची नीचांकी पातळी आहे. विश्लेषकांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढणे सुरू ठेवल्यामुळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण होत असल्यामुळे शेअर बाजार कोसळला आहे.

बातम्या आणखी आहेत...