आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुवर्ण' संधी:अखेर सोने साठ हजारांच्या खाली!, ऐन लग्नसराईत अंशतः दिलासा, प्रतितोळा 59 हजार 700 रुपये दर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवडाभरापासून अस्थिर असणारे सोन्याचे भाव अंशत घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 59 हजार 720 रुपये तोळा एवढा झाला आहे. 60,000 रुपयांच्या खाली सोने आल्याने ऐन लग्नसराईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

कोणत्या भागात किती दर ?

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे दरात घसरण झाली. दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,820 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम 54,850 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 59,670 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 54,700 रुपये आहे. कोलकातामध्ये दहा ग्रॅम स्टँडर्ड सोन्याचा दर 54,700 रुपये आणि दहा ग्रॅम स्टँडर्ड सोन्याचा दर 59,670 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेले असते.कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क म्हणजे काय?

सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता ओळखण्यासाठी हॉलमार्क चिन्ह पाहिले जाते. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.