आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांसाठी 'अच्छे दिन'!:उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे एसी लोकलला अच्छे दिन; एरवी रिकाम्या धावणाऱ्या वातानुकुलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाली आहे. उन्हाचा कडाका देखील मागच्या आठवड्यापासुन वाढला आहे. तसेच या वाढत्या उष्णतेुमुळे मध्ये रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या लोकल रिकाम्या झाल्या आहेत. त्याचदरम्यान प्रवाशींची गर्दी देखील कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकलमुळे नियमितच्या लोकलचे वेळापत्रक मागेपुढे झाले असून अशी चौफेर चर्चा प्रवासी करत आहेत. तसेच याबाबत प्रवाशांकडून टीका देखील केली जाते. मात्र, तापमानाचा पारा 40 च्या वर गेल्यापासून उन्हाच्या काहिलीने, घामांच्या धारांनी हैराण झालेले प्रवासी थोडी खिशाला कात्री लावत, पण गारेगार वातानुकुलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी 8.59 ला कल्याणहून येणारी वातानुकुलित लोकल मोजकेच प्रवासी चढून सुरू व्हायची. उन्हाचा पारा वाढल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत कल्याणहून येणारी वातानुकुलित लोकल प्रवाशांनी गच्च भरलेली असते. कल्याणहून प्रवासी बसून, उभे राहून येतात. एवढी गर्दी या लोकलला वाढू लागली आहे.

रोजच्या दैनंदिन जीवनात गर्दीतुन प्रवास केल्याने घामाने शरीर ओथंबून जाते. या गर्दीमुळे व वाढच्या उष्णतेमुळे कामात लक्ष लागत नाही. उष्णता वाढल्यापासून वातानुकुलित लोकलने आम्ही मित्र प्रवास करत आहोत, असे प्रवाशांच्या एका गटाने सांगितले. या लोकलचा वाढत्या तिकीट दरामुळे नियमितचा प्रवास सामान्य प्रवाशाला परवडणारा नाही. पण उन्हाच्या चटक्यामुळे होणारी अस्वस्थता दूर करणे आणि आरोग्याचा विचार केला तर गारेगार लोकल उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच आरामदायी वाटते.

बातम्या आणखी आहेत...