आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे स्ट्रीट पोलिस:नागरिकांचे संबंध दृढ करण्याचा चांगला उपक्रम : अक्षय

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉइंटसह एकूण १३ ठिकाणी संडे स्ट्रीट उपक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, ‘कोविडकाळात सर्वत्र शांतता होती. परंतु आता दिसणारे हे चित्र दिलासादायक आहे. संडे स्ट्रीट कल्पना कायम स्वरूपी राबवावी. पोलिसांचे लोकांसोबत संबंध दृढ करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे.’

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावे. त्यांना मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांसारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरिता मुंबई पोलिसांमार्फत ‘संडे स्ट्रीट’ संकल्पना राबवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...