आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल:भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही; मुख्यमंत्र्यांवरही डागली तोफ

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मित्राच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर त्याला एक कोटी रुपये देण्यात आले. एखाद्या कबड्डीपटूची ओळख मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी नाही तर त्याला काहीही देऊ नये. ही कोणती व्यवस्था आहे? अशा प्रकाराचा जळजळीत सवाल भाजप खासदाराने केला आहे. मात्र, त्यांनी हा शाब्दिक हल्ला विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर केला होता की माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर, हे स्पष्ट केले नाही.

गोपाळ शेट्टी भाजप आमदार, नगरसेवक आणि नेत्यांवर भडकले

भाजप खासदार शेट्टी यांनी एका कार्यक्रमात जाहीर मंचावरून सांगितले की, त्यांनी कुणाल केरकर नावाच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला साईबाबा नगर (बोरिवली) येथे व्यायामशाळा बांधून दिली होती. ही व्यायामशाळा व्यवस्थित चालत होती. आणि कुणाल केरकर भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला 100 ते 200 कार्यकर्त्यांसह उपस्थित असायचा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ती व्यायामशाळा बंद करण्यात आली होती. असे असतानाही माझ्या पक्षाच्या नगरसेविका बिना दोशी, माझ्या पक्षाच्या आमदार, भाजपचे बोरिवली मंडल अध्यक्ष आणि उत्तर मुंबई भाजप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही काहीही केले नाही. त्यामुळे तीन हजार चौरस फुटांची व्यायामशाळा भाजप कार्यकर्त्याच्या हातातून गेली. पक्षाचे नेतेच कार्यकर्त्याला मदत करणार नसतील तर तुमच्यासोबत कोण काम करणार. असा सवाल त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना केला आहे.

भाजप आमदार सुनील राणेंवर हल्लाबोल

राजेश नावाच्या स्थानिक मनसे कार्यकर्त्याचा उल्लेख करून त्यांनी आपली वेदना व्यक्त केली. या मनसे कार्यकर्त्यामुळे कामात अडथळे येत होते. त्यामुळेच मी त्याला व्यायामशाळा बनवून दिली. मी या व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी गेलो असताना भाजपचे कार्यकर्ते आले नाहीत. ते पुढे म्हणाले की, भाजप नेत्यांना स्थानिक पातळीवर काम करता यावे यासाठी मी मनसे कार्यकर्त्याला व्यायामशाळा बनवून दिली. पण भाजपचे कार्यकर्ते उद्घाटन कार्यक्रमाला आले नाहीत. तुम्ही बाहेरच्या कार्यकर्त्याला बोरिवलीत आणून तिकीट दिले. मात्र भाजपचा स्थानिक कार्यकर्ता 20 ते 30 वर्षांपासून काम आणि संघर्ष करत आहे. बाहेरील कार्यकर्त्यांना तिकीट मिळाल्याने भाजपच्या या जुन्या कार्यकर्त्यांना मानही दिला जात नाही. बोरिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुनील राणे यांचे नाव न घेता भाजप खासदार शेट्टी यांनी हा हल्लाबोल केला आहे.

मंत्र्यावर संतापले

जया शेट्टी नावाच्या कबड्डीपटूला छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. त्यांनी जिच्याशी विवाह केला त्या महिला कबड्डीपटूलाही छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. या दोन्ही कबड्डीपटूंचा मुलगा गौरव याला सुवर्णपदक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. हे कबड्डीपटू महाराष्ट्र सरकारकडे एक घराची मागणी करत आहेत. या खेळाडूंच्या मागणीबाबत मी माझ्या पक्षाचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले, मात्र ते न्यायालयाचा हवाला देऊन मागणी फेटाळत आहेत. अशा शब्दांत भाजप खासदाराने आपल्याच सरकारच्या मंत्र्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे

बातम्या आणखी आहेत...